खोळंबलेल्या मान्सूनची परतीच्या प्रवासाला सुरुवात

पावसाच्या मुक्कामाचे महाराष्ट्रात शेवटचे दोन दिवस


मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात पावसाने पूर परिस्थिती निर्माण केली. नंतर अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ सक्रिय झाल्याने पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम वाढवला. आता राज्यातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौल या मार्गांमधून जात आहे. म्हणजेच राज्यातील विविध भागातून हळूहळू मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मान्सूनचा पाऊस हळूहळू कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनच्या परतीच्या या प्रवासामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अजूनही होऊ शकतो.



हवामान खात्याचा अंदाज


यंदा ठरलेल्या वेळेच्या आठवडाभर आधीच सुरू झालेला नैऋत्य मौसमी पाऊस २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दोन आठवडे आधीच तो महाराष्ट्रात पोहोचला. जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला होता. आता हवामान विभागाने परतीचा पाऊस लवकरच सुरू होईल, असा अंदाज वर्तवला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधून पुढील २४ तासांत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातून मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आलेले नाहीत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे.

Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित