प्रतिनिधी:एका वेगळ्या कारणासाठी एलजी आयपीओ चर्चेत आला आहे. एलजी (LG Electronics Limited) कंपनीच्या ११६०७.०१ कोटी आयपीओला बाजाराला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे एकूण आयपीओला ५४.०२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बाजार तज्ञांच्या मते कंपनीच्या जीएमपी (Grey Market Price) ३८% प्रिमियम दरासह सुरू असून कंपनीच्या एकूण सबस्क्रिप्शनपैकी ३.५५ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, १६६.५१ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून व २२.४ ४ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले असले तरी एका निष्क्रिय कंपनीने एलजी आयपीओत मोठी गुंतवणूक केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विनरो कर्मशिअल लिमिटेड (Winro Commercial Limited) कंपनीने थेट ७४९ कोटींची बोली (Bidding) आयपीओत लावल्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ३१ कोटी भागभांडवल (Market Capitalisation) असलेल्या कंपनीकडून येवढ्या मोठ्या प्रमाणात बिडिंग मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाजारातील रिपोर्टमध्ये आणखी म्हटल्याप्रमाणे, या विनरो या विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) ने बीएसईवर केलेल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की कंपनीने एलजी आयपीओत ६५.६ लाखां चे शेअर खरेदी करण्यासाठी बिडिंग केले आहे. ११४० रूपये प्रति शेअर खालच्या पट्टीतील प्राईज बँडसह कंपनीने हा अर्ज केला होता. ज्यांचे मूल्यांकन ७४९ कोटींच्या घरात आहे.
बाजार तज्ञांच्या मते, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून एखाद्या आयपीओत केली जाणारी गुंतवणूक ही कंपनीच्या स्वतः च्या बाजार भांडवलाच्या आधारे असते. मात्र ३१ कोटी भागभांडवल असलेल्या कंपनीने ७४९ कोटींचे बिडिंग केले असून कंपनीने गेल्या का ही वर्षांतील वार्षिक अहवाल (Annual Report) अजून बीएसई संकेतस्थळावर अपडेट केलेले नाहीत. यापूर्वी वेळोवेळी कंपनीने निकाल अपलोड केला होता. त्यांच्या माहितीनुसार, शेवटचा वार्षिक अहवाल सन २०१५ साली प्रदर्शित केला आहे. आतापर्यंत एकू ण १६६.५ पटीने सबस्क्रिप्शन पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून मिळालेले आहे. या विनरो कर्मशिअल लिमिटेड कंपनीला इयर ऑन इयर ऑन बेसिसवर ४८१ कोटींचा नफा मिळाला होता.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ पूर्णपणे ११६०७.०१ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) होता, ज्याचा प्राईज बँड प्रति शेअर १०८०-११४० रुपये होता.गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आणि ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त स बस्क्रिप्शन रकमेसह इतिहास रचल्यानंतर,सर्वांचे लक्ष आता एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओ वाटपावर आहे, जे आज, १० ऑक्टोबर रोजी अंतिम केले जाईल. वाटपानंतर एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी स्टॉक एक्सचेंज म ध्ये सूचीबद्ध होणार आहेत.