Avenue Supermarts Q2Results: डी मार्ट कडून त्यांचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात ३.५८% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठ्या रिटेल चेनपेकी एक असलेल्या डी मार्ट ब्रँडची मालक अव्हेन्यू सुपरमार्टने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) या तिमाहीतील कंसोलिडेटेड नफा (एकत्रित नफा) ३.८५% वाढून ६७४.८५ कोटीवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ६५९.४४ कोटींचा नफा झाला होता.कंपनीला कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये सप्टेंबर तिमाहीत १५.४५% वाढ वाढ झाली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या १४४४४.५० कोटींच्या तुलनेत हा वाढत १६६७६.३० कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही आकडेवारी थोड्या वेळापूर्वी जाहीर केली आहे.कंपनीच्या मार्जिनमध्ये किरकोळ घसरण झालीआहे. कंपनीने पीएटी (करोत्तर) मार्जिन या तिमाहीत ४.१% प्राप्त केले आहे जे मागीलवर्षी तिमाहीत ४.६% प्राप्त केले होते. माहितीनुसार, कंपनीच्या खर्चात (Expenses) वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीच्या खर्चात १६% वाढ झाली आहे ज्यामध्ये मागील वर्षाच्या तिमाहीत तो १५७५१. .०८ कोटी होता जो यंदा १६६९५.८७ कोटी होता. तसेच कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. इयर बेसिसवर कंपनीच्या उत्पन्नात १५.३% वाढ झाली आहे ज्यामध्ये उत्पन्न १६६९५.८७ कोटींवर पोहोचले.


तिमाहीतील निकालांवर भाष्य करताना नवनियुक्त सीईओ अंशुल असावा म्हणाले आहेत की,'दोन वर्षे आणि त्याहून जुन्या डीमार्ट स्टोअर्सनी आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ६.८% वाढ केली आहे.शिवा य, दमानी कुटुंबाने प्रमोट केलेल्या या फर्मने लागू असेल तिथे किमती कमी करून जीएसटी सुधारणांचे फायदे ग्राहकां ना दिले आहेत.याशिवाय, डी-मार्टच्या वरिष्ठ नेतृत्वातील बदलाचा भाग म्हणून असावाने तिमाहीत डीमार्ट रिटेल स्टोअर व्यवसायाच्या सर्व ऑप रेशनल पैलूंची जबाबदारी घेतली आहे' असे कंपनीने म्हटले आहे.


२००७ पासून डी-मार्टचे सीईओ असलेले नेव्हिल नोरोन्हा यांनी जानेवारी २०२६ मध्ये पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये डी-मार्टने असावा यांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. नोरोन्हा, ज्यांचा सध्याचा कार्यकाळ जाने वारी २०२६ मध्ये संपत आहे, त्यांनी त्यांच्या भूमिकेचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिमाहीत, डी-मार्टने आठ नवीन स्टोअर्स उघडले, ज्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची एकूण स्टोअर्सची संख्या ४३२ झाली.तथापि, या तिमाहीत त्यांनी अमृत सर, बेळगावी, भिलाई, चंदीगड आणि गाझियाबाद या पाच शहरांमध्ये त्यांची ई-कॉमर्स सेवा डी-मार्ट रेडीचे कामकाज बंद केले होते.'आम्ही आमच्या विद्यमान बाजारपेठांमध्ये १० नवीन पूर्तता केंद्रे जोडली आणि मोठ्या महानगरांमध्ये गुंतवणूक करणे आणि आम ची उपस्थिती वाढवणे सुरू ठेवले' असे त्यांचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ, अव्हेन्यू ई-कॉमर्स विक्रम दासू म्हणाले प्रसारमाध्यमांना म्हणाले आहेत.


उद्योगपती व गुंतवणूकदार राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाद्वारे प्रमोट केलेले, डी-मार्ट महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, एनसीआर, छत्तीसगड आणि दमण यासारख्या बाजारपेठांमध्ये मूलभूत घरगुती आणि वैयक्तिक उत्पादनांची किरकोळ विक्री करते. स्वस्त दरात विक्रीसाठी डी मार्टने लोकप्रियता बाजारात यापूर्वीच मिळवली आहे.अव्हेन्यू सुपरमार्टचा शेअर ०.५३% उसळत ४३२८ रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा