Nitesh Rane : 'जागा आणि वेळ कळवा, किंवा मस्जिद निवडा': मंत्री नितेश राणेंचे वारिस पठाणांना जाहीर आव्हान

'आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून संताप; 'धमक्या देऊ नका, हैदराबादमार्गे पाकिस्तानात पाठवावे लागेल'


मुंबई : भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना थेट आणि आक्रमक भाषेत आव्हान दिले आहे. 'आय लव्ह मोहम्मद' (I Love Mohammad) बॅनरच्या वादग्रस्त घटनेवरून राणे संतापले असून, त्यांनी थेट वारिस पठाणांवर जोरदार निशाणा साधला.


राणे म्हणाले, “जागा आणि वेळ कळवा, किंवा मस्जिद निवडा. हे नसबंदीवाले पिलावळ आहे. धमक्या देऊ नका, तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. आता यांना हैदराबाद मार्गे पाकिस्तानात पाठवण्याचं काम करावं लागेल.”


राज्यात 'हिरव्या सापांची वळवळ' सुरू झाल्याचा आरोप करत राणेंनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना तिखट शब्दांत फटकारले. “राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न असेल, तर सरकारलाही विचार करावा लागेल की अशा सभा होऊ द्यायच्या की नाही,” असा इशारा त्यांनी दिला.



राणे यांनी यावेळी धार्मिक भावनांचा मुद्दा उपस्थित केला. “भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. पैगंबर आणि कुराणावर बोललं तर वळवळतं, पण आमच्या देवींचे हात तोडता तेव्हा आम्ही गप्प बसायचं का?” असा सवाल त्यांनी केला.


याशिवाय, एमआयएमवर टीका करताना राणे म्हणाले, “यांना शरीया आणायचा आहे, हे लोकं डॉ. आंबेडकरांना मानत नाहीत.” त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकजुटीवर जोर देत, "खरा सनातनी हिंदू तोच, जो शिवशक्ती आणि भीमशक्तीला मानतो," असे स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू