दिवाळीमध्ये आप्तेष्टांना काय भेट द्यावी समजत नाही? 'या' पर्यायांचा विचार नक्की करा!

अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी सणादरम्यान येणाऱ्या दिवाळी पाडव्याला पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. तर भाऊबीजच्या दिवशी बहीणभाऊ एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच दिवाळीला आपण आपल्या आप्तेष्टांनाही भेटतो.वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाला आपण त्यांनाही छोटी-मोठी भेट देतो. मात्र काही वेळा आपल्याला काय भेट द्यावी? असा प्रश्न पडतो. तुम्हाला सुद्धा भेटवस्तू काय द्यावी याबद्दल विचार करायला अधिक वेळ लागत असेल तर खालील पर्याय तुम्हाला नक्की मदत करतील.


ड्रायफ्रुट्स: दिवाळी दरम्यान अनेक दुकानांमध्ये रंगीबेरंगी बॉक्समध्ये ड्रायफ्रुट्स विक्रीस असतात. ड्रायफ्रुट्स हे अधिक काळ टिकतात. तसेच ते शरीरासाठी आरोग्यदायी असतात. त्यामुळे दिवाळीमध्ये ड्रायफ्रुट्स हा भेट देण्यासाठी मिठाईपेक्षा उत्तम पर्याय आहे.


हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू: हाती बनवलेल्या वस्तूसुद्धा तुम्ही दिवाळीमध्ये भेट म्हणून देऊ शकता. हाताने तयार केलेल्या कलाकृतींची किंमत ही मशिनने बनवलेल्या गोष्टीपेक्षा अधिक असते. कारण त्यामध्ये कलाकार आपल्या कौशल्याने नाविन्यता दाखवत असतो. दिवाळी दरम्यान अनेक ठिकाणी हाती तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन सुरु असते. या प्रदर्शनांमध्ये काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. त्यामुळे आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये आपण भेटवस्तू घेऊ शकतो.


पितळेची बाटली: दिवाळीमध्ये भेट देण्यासाठी पितळेची बाटली हा एक उत्तम पर्याय आहे. पितळेच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. ही बाटली महाग असल्यामुळे जास्त कोणी वापरत नाही. त्यामुळे तुमचा बजेट जर हजार रुपयांपर्यंत असेल तर पितळेची बाटली भेटवस्तूसाठी योग्य पर्याय आहे.


इनडोअर झाडे (Indoor plants): इनडोअर झाडांना सूर्यप्रकाश आणि पाण्याची आवश्यकता कमी लागते. तसेच घरातील वातावरणात शुद्धता आणण्याचे काम ही झाडे करतात. या झाडांची किंमतसुद्धा खिशाला परवडणारी असते. ज्यात मनी प्लांट, स्नेक प्लांट, पीस लिली, बोस्टोन फर्न या झाडांचे पर्याय आहेत. त्यामुळे इनडोअर झाडे हा भेटवस्तूसाठी अजून एक चांगला पर्याय आहे.


अशाप्रकारे तुम्ही विविध पर्यायांचा विचार करून भेटवस्तू देऊ शकता.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना