ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस आहे.

अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पास योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये

उपलब्धता : ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. (ई-शिवनेरी बससेवा वगळून)

मासिक पास:(३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांसाठी पास दिला जाईल.

त्रैमासिक पास: (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास उपलब्ध होईल.

सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.

फरक भाडे नियम: निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

Andheri Marol Gas Leak.. अंधेरीतील रमाबाई नगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट, लाईट सुरू करताच ठिणगी पेटली

अंधेरी : मुंबईतील अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील रमाबाई नगर परिसरात पहाटे गॅस लीकमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना

महापालिका मुख्यालयाची दृष्टी सुधारणार; इमारतीत एआय आधारीत सीसी टिव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालय इमारतीत बसवण्यात आलेल्या सी सी टिव्ही कॅमेरे जुने झाले

नरे पार्कच्या तुटलेल्या भिंती, पदपथांची होणार दुरुस्ती

मुख्य प्रवेशद्वारांसह होणार मैदानाची रंगरंगोटी मुंबई (विशेष प्रतिनिधी): परळमधील नरे पार्कचे मैदान या

निवडून येणाऱ्या जागांवरच भाजपाच्या इच्छुकांच्या उड्या

जिंकून येणाऱ्या जागांवर परस्पर होते घुसखोरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच,