उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर' औषध लावलं; दोघांना अटक

मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा लोकांच्या जीवावर बेतू शकतो अशीच एक घटना समोर आली आहे. यात फळ विक्रेत्याकडून फळांवर चक्क उंदीर मारण्याचं औषध (Ratol) सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाई करत फळांना 'रॅट किलर' औषध लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे.



मुंबईकरांच्या जीवाशी खेळ



दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, फळ विक्रेता कच्च्या फळांना पिकवण्यासाठी थेट विषारी क्रीम लावून पकवत आहे. फळविक्रेताजे Ratol सारखे विषारी पदार्थ वापरात आहे ते वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या फळविक्रेताकडून मुंबईकरांची आरोग्याची चिंता नसून तो सर्रासपणे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून फळविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी पालिका आणि पोलिसांकडे केली. त्यांनतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई केली आहे. यात उंदीर मारण्याचे औषध फळांवर लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली असून मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या आरोपींची नावे आहेत.


खरंतर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनधिकृत फळवाले स्टॉल लावून फळ विकतात. कच्चे फळ लवकर पिकण्यासाठी चक्क विषारी पदार्थ लावून फळ लवकर पिकवून मग विकतात. मात्र, अशामध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडत असल्याचे देखील नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीवाशी खेळणारे असे फळविक्रेतांवर तात्काळ पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरू आहे.


तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता उंदरांपासून बचावासाठी प्रयोग केल्याचा अजब दावा फळविक्रेत्याने केला आहे. 'उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो' अशी कबुली फळविक्रेत्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने घेत जप्त केले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली