विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारतीय चाहत्यांना सलामीवीर स्मृती मंधानाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. स्मृती २३ धावा करून बाद झाला. याआधी श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध स्मृतीने अनुक्रमे ८ आणि २३ धावा केल्या होत्या.
दरम्यान, द. आफ्रिकेविरुद्ध स्मृती मंधानाने जरी छोटी खेळी केली असली तरी स्मृती मंधानाने नवा इतिहास रचला आहे. स्मृती आता एका कॅलेंडर वर्षात महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क हिचा २८ वर्षे जुना रेकॉर्ड तोडला. मंधानाने हा रेकॉर्ड सिक्स लगावत पूर्ण केला.
बेलिंडा क्लार्कने १९९७मध्ये महिला वनडेत एकूण ९७० धावा केल्या होत्या. तर स्मृती मंधानाने या वर्षी १७ वनडेमध्ये ९२ धावा केल्या आहेत. यात तिची सरासरी ५७.७६ आणि स्ट्राईक रेट ११२.२२ होता. स्मृती मंधानाने २०२५मध्ये महिला वनडेमध्ये ४ शतके आणि ३ अर्धशतके ठोकली आहेत.