जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू


जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर महामार्गावर एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला. एकामागून एक २०० सिलिंडरचा स्फोट झाला. काही ५०० मीटर अंतरावर शेतात पडले. १० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुमारे दोन तास सिलिंडरचा स्फोट होत राहिला.


या अपघातात एक व्यक्ती जिवंत जळाली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये अंदाजे ३३० सिलेंडर होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "आरटीओ गाडी पाहून टँकर चालकाने गाडी ढाब्याकडे वळवली.


यादरम्यान, ती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली." जयपूरमधील डुडू येथील मोखमपुराजवळ हा अपघात झाला. पाच पार्क केलेल्या वाहनांनाही आग लागली. या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.


Comments
Add Comment

डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्‍लॅटफॉर्म्‍स मुंबईतील ग्राहक अर्थव्‍यवस्‍थेला चालना देतात- लिंक्‍डइन

लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास मुंबई:लिंक्‍डइन (Linkedin) या वैश्विक पातळीवरील मोठ्या

डीपी वर्ल्ड पायाभूत सुविधा परिसंस्थेसाठी भारतात ५ अब्ज डॉलर्स गुंतवणार !

गेल्या तीन दशकांमध्ये केलेल्या ३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीला चालना मुंबई: डीपी वर्ल्डने भारतात ५ अब्ज डॉलर्सची

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे

भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

"वर्ल्ड वेगन डे" का साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस जागतिक वर्ल्ड वेगन डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांनी