हार्दिक पंड्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये Lamborghini Urus SE ची एन्ट्री

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने आपल्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini Urus SE या आलिशान SUV गाडीचा समावेश केला आहे. ही कार ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती आणि खास गोष्ट म्हणजे ही भारतात लाँच झालेली पहिली प्लग-इन हायब्रिड SUV कार आहे. हार्दिकने ही कार पिवळ्या रंगात खरेदी केली असून, तिची किंमत तब्बल ४.५७ कोटी रुपये आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून त्याचे भरभरून अभिनंदन होत आहे.


ही गाडी केवळ स्टाईलिशच नाही, तर तितकीच पॉवरफुल देखील आहे. Lamborghini Urus SE मध्ये हायब्रिड इंजिनचा वापर करण्यात आला असून, ते उत्तम मायलेजसह जबरदस्त परफॉर्मन्स देते. ही SUV स्पोर्टी लूक, अत्याधुनिक फीचर्स आणि जबरदस्त टॉप स्पीडसह येते. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींनी या गाडीला पसंती दिली आहे.


इतक्या प्रीमियम गाडीची निवड केल्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो आधीपासूनच विविध लक्झरी कार्ससाठी ओळखला जातो. त्याच्या गॅरेजमध्ये Mercedes, Range Rover, Audi अशा अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. आता Lamborghini Urus SE ही कार त्याच्या कलेक्शनमधील एक नवीन आकर्षण ठरली आहे.

Comments
Add Comment

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या