आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन


मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा गतिमान करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून याचाच एक भाग म्हणून आगामी काळात तब्बल १७०० नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ८७२ कोटी रुपये खर्च येणार असून यातील ४९ टक्के रक्कम आरोग्य विभाग तर उर्वरित ५१ टक्के रक्कम ज्या संस्थेच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका सेवा चालवण्यात येणार आहे, त्यांनी खर्च करावयाची आहे.


राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय, अशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. सध्या आरोग्य विभागाअंतर्गत १०८ रुग्णवाहिकेसोबतच १०२, १०४ व ११२ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत. आरोग्य विभागाकडे १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका आहेत तर १०२ क्रमांकाच्या ३५०० रुग्णवाहिका असून नंदुरबारसारख्या ठिकाणी काही बोट रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बाईक रुग्णवाहिका ही संकल्पनाही राबवण्यात येत असून त्यालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सतराशे रुग्णवाहिकांमध्ये काही रुग्णवाहिका या नवजात अर्भकांसाठी असतील तर नंदुरबारसारख्या भागाचा विचार करून बोट रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत.


राज्याच्या रुग्णसेवेत लवकरच नवीन अत्याधुनिक १५२८ अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिका घेण्यात येणार असून यातील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ५०० रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. नवीन अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिकेसोबतच सध्या १०२,१०४ न ११२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या एमएसआरडीसी, एनएचएआय या संस्थांच्या वतीने महामार्गावर, टोल नाक्यावर, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क तयार केल्यास रुग्णांना गोल्डन अवर मध्ये जलद रुग्णसेवा उपलब्ध होईल. आरोग्य विभागाच्या १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिका सेवावर ‘महाराष्ट्र शासन’ असे स्पष्ट लिहिण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या