Advance AgroLife IPO Listing: यशस्वी आयपीओनंतर पहिल्या दिवशीच दमदार पदार्पण मात्र शेअरमध्ये दुपारीच जोरदार घसरण

मोहित सोमण:अँडव्हान्स अँग्रोलाईफ (Advanced Agro Limited) कंपनीचा शेअर आजपासून बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. १९२.८६ कोटींचा आयपीओ ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत बाजारात दाखल झाला होता. आज हा शेअर बीए सई व एनएसईवर सूचीबद्ध झाला असून शेअर सुरूवातीच्या सत्रात संपूर्णपणे गडगडला आहे. सत्र सुरू झाल्यावरच खरं तर कंपनीचा शेअर १३% प्रिमियम दराने बाजारात सूचीबद्ध झाला होता. १०० रुपयांच्या प्राईज बँडसह आलेला हा शेअर ११३ रूपयांवर व्यव हार करत होता. मात्र दुपारी १.१५ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २४.८६% कोसळला असून १०७ रूपयांवर व्यवहार करत आहे.


आयपीओला एकूण ५६.९० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामुळे बाजाराने मोठा कौल आयपीओला दिला होता. पब्लिक इशूपैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून २३.१४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २७.३१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदा रांकडून १७५.३० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर कंपनीच्या शेअरची शेवटची जीएमपी १४% अधिक होती. कंपनीचा शेअर ११४ रूपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला. आयपीओआधी ५७.७७ कोटी रुपयांचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने उभार ला होता.


२००२ मध्ये स्थापन झालेली अ‍ॅडव्हान्स अ‍ॅग्रोलाइफ लिमिटेड कंपनी ही विस्तृत श्रेणीतील कृषी रसायन उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. कंपनीची उत्पादने भारतातील खरीप आणि रब्बी हंगामात प्रमुख धान्ये, भाज्या आणि बागायती पिकांच्या लागवडीसाठी वापरली जातात. कंपनीला आर्थिक वर्षात महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ प्राप्त झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४% वाढ मिळाली होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६४ २.८६ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात