विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या


विरार : विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


विरार पश्चिमेला आगाशी अर्नाळा रस्त्यावरील ओलांडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री दोन विद्यार्थ्यांनी या इमारतीवरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.


अशी पटली मृतांची ओळख....


मृत मुलांकडे मोबाईल फोन नसल्याने त्यांनी ओळख पटविण्यात पोलिसांसमोर अडचणी येत होत्या. हे दोन विद्यार्थी ज्या दुचाकीवरून आले होते त्या दुचाकीवर असणाऱ्या क्रमांक पट्टीच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे हे दोन तरुण नालासोपाऱ्याच्या आचोळे येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्या कुटुंबियांशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. श्याम सनद घोरई (२०) आणि


आदित्य रामसिंग (२१ ) अशी त्यांची नावे असून ते दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत होते. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.


Comments
Add Comment

पालघरमधील विविध प्रकल्पांविरुद्ध संघटनांचा आक्रोश मोर्चा

‘कष्टकरी’, माकपसह अनेक संघटना सहभागी पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदर, चौथी मुंबई आणि

एससी, एसटी, ओबीसी आरक्षण ‘राजयोग’ आणणार

बविआकडे अनु. जमातीचे पाच, मागासवर्गीय तीन नगरसेवक गणेश पाटील,विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही

प्रजासत्ताक दिनापर्यंत नव्या महापौरांची निवड शक्य नाही

झेंडावंदनाचा मान मिळणार प्रशासकांनाच आगामी आठवड्यात ठरणार महापौर पदाचे आरक्षण विरार : वसई-विरार महापालिकेत

वसई-विरार महापालिकेत निवडले जाणार १० स्वीकृत सदस्य

महायुतीला चार, तर बविआला मिळणार सहा जागा गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ सदस्य संख्येच्या