दिल्लीत गोळीबाराचा थरार, नेपाळच्या चोराचा दिल्लीत एन्काउंटर

नवी दिल्ली : नेपाळचा कुख्यात चोर भीम बहादुर जोरा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दक्षिण दिल्लीच्या आस्था कुंज पार्कमध्ये दिल्ली आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. भीम जोराने पोलिसांना पाहताच गोळ्या झाडल्या. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांची गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भीम बहादुर जोराला दिल्लीच्या एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी गुरुग्राममधील सेक्टर ४८ येथील भाजपच्या जिल्हाध्यक्षा ममता भारद्वाज यांच्या घरी २२ लाख रुपयांची मोठी चोरी झाली होती. पोलिस तपासात असे दिसून आले की, हा गुन्हा नेपाळी गुन्हेगार भीम बहादूर जोरा याने केला होता. या गुन्ह्यासाठी त्याने भारद्वाज यांचा घरगुती नोकर युवराज थापा याची मदत घेतली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने नोकर युवराज थापाला आधीच अटक केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून या चोराचे चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. भीम बहादुर जोरावर केवळ चोरीचे आरोप नाहीत. तर त्याने दिल्लीच्या एका डॉक्टरांचीही हत्या केली होती. त्यामुळे त्याची दहशत संपूर्ण शहरात पसरल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. त्याला पकडून देणाऱ्याला ५० हजार एवढा इनाम सुद्धा घोषित झाला होता. मात्र आज सकाळी पोलीस चकमकीत तो ठार झाला.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी