दिवाळीच्या खरेदीमागचं शास्त्र आणि श्रद्धा : जाणून घ्या काय खरेदी करावं!

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीमध्ये पारंपरिक खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.


ही परंपरा केवळ आर्थिक लाभासाठी नव्हे, तर धार्मिक श्रद्धांमुळेही महत्त्वाची मानली जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीचे पूजन करून आरोग्य व संपत्तीचा आशीर्वाद मागितला जातो. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या काळात कोणकोणत्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते, हे जाणून घ्या.


लक्ष्मी - गणेश मूर्ती : दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती विकत घेणे शुभ मानले जाते. लक्ष्मी देवी ही संपत्तीची, तर गणपती बुद्धीचे देवता मानले जातात. या मूर्ती दिवाळी पूजेसाठी आवश्यक समजल्या जातात आणि समृद्धीचे प्रतीक ठरतात.


झाडू : अनेकजण दिवाळीच्या खरेदीमध्ये नवीन झाडू घेण्याला प्राधान्य देतात. झाडू देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती घरात शुद्धता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते. त्यामुळे झाडू खरेदी ही एक शुभ परंपरा म्हणून रूढ झाली आहे.


दिवे (तेलाचे/मातीचे दिवे) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. घरभर दिवे लावून अंधार दूर केला जातो. दिव्यांच्या प्रकाशात सकारात्मक ऊर्जा फुलते आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते, असा समज आहे. दिवे ज्ञान, विजय आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.


नारळ : पारंपरिक पूजेमध्ये नारळाचा विशेष मान असतो. दिवाळीच्या पूजेसाठी नारळ अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते. काहीजण तो तिजोरीत ठेवून सततची समृद्धी साधण्याचा विश्वास ठेवतात.


दिवाळीचा सण केवळ रोषणाईचा आणि मिठाईचा नसून, श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक सुबत्तेचा संगम आहे. या काळात केलेली खरेदी फक्त वस्तू मिळवण्यापुरती मर्यादित नसून, तिच्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत