बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित

बदलापूर (वार्ताहर) : आज राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी ६७ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून ३४ नगर परिषदेत ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहेत.


यामध्ये कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचा समावेश आहे. सोडत काढून नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील अनेक दिग्गजांची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पहाणाऱ्यांची निराशा झाली असून आयत्यावेळी वेगळ्याच प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याने राजकीय पक्षांना नवीन चेहरा शोधावा लागणार आहे.


बदलापुरात सोशल मीडियावर संभाव्य नगराध्यक्ष म्हणून रती पातकर, रुचिता घोरपडे, रचना भोईर, वीणा म्हात्रे, उषा म्हात्रे, शीतल राऊत आणि संगीता चेंदवणकर यांची नावे व्हायरल होत आहेत.

Comments
Add Comment

मिताली राज आणि रवी कल्पनाच्या नावांच्या स्टॅण्डचे अनावरण

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था): येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप

कल्याणच्या काळा तलावात झाडे तोडून साकारतोय फुड प्लाझा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणचा ऐतिहासिक काळा तलावाचे (भगवा तलाव) स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात