लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसानिलंगा राष्ट्रीय महामार्गावर आज घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला.बोलेरो गाडी आणि ट्रकच्या दरम्यान आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. . घटनास्थळी स्थानिक व वाहनांनी गर्दी केली होती, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला आहे.


औसा शहरातील पोतदार शाळेसमोर ही दुर्घटना घडली. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी भाऊ प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. लातूरकडे जाणाऱ्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने बोलेरोने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले, आणि त्याच वेळी ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर बोलेरो आणि ट्रक दोन्ही वाहनांचे चालक वाहनांसह घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून सध्या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी रेवण धमाले यांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची

Akola Crime : अकोल्यात वर्दीला काळिमा फासणारी घटना; कोठडीतल्या महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

अकोला : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीदवाक्य, ज्याचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

कुंभमेळ्याच्या रिंग रोडला असलेला अडथळा अखेर संपला

उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यश नाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून