कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर ते कार्तिक एकादशीला पूजा करतात. पण राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचं निमंत्रण द्यायचं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूजेचं निमंत्रण द्यायचं? या पेचात पंढरपूरची मंदिर समिती पडली होती. मंदिर समितीची काल महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या बैठकीत विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याबाबत ठरलं. त्यानुसार विधी आणि न्याय विभागाला विचारणा करण्यात आली. यानंतर विधी आणि न्याय विभागाने एकनाथ शिंदे पूजेला येतील, अशी माहिती दिली.


कार्तिकी एकादशी ही येत्या १ नोव्हेंबरला असणार आहे. या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली तर निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली जाईल. निवडणूक आयोगाच्या परवानगी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची पूजा पार पडेल.


यापूर्वीही २०२३ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली होती. २०२४ मध्ये कार्तिकी यात्रा काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पुणे येथील विभागीय आयुक्त कुलकुंडवार यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा झाली होती. याही वर्षी कार्तिकी यात्रा काळात जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागण्याची शक्यता असून अशावेळी निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येऊ शकणार आहे.


यापूर्वीही २०१७ मध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा झाली होती. त्याच पद्धतीने जरी आचारसंहिता लागली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येणार आहे. या निर्णयानंतर मंदिर समिती एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या