गुंड निलेश घायवळच्या घरावर धाड, पोलिसांच्या हाती लागलं घबाड


पुणे : कोथरुडमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी गुंड निलेश घायवळ विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवला. पण पोलीस कारवाई होण्याआधीच निलेश घायवळ फरार झाला. तो परदेशात असल्याचे वृत्त आहे. घायवळ फरार झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी घायवळच्या पुण्यातील घरावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड आले आहे. संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घायवळविरुद्ध सर्व आघाड्यांवर कारवाईचा फास आवळला आहे.


पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने निलेश घायवळच्या कोथरुडसह पुण्यातील विविध ठिकाणांवरील घरांवर धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी बंदुकीच्या जिवंत गोळ्या, रिकाम्या पुंगळ्या, अनेक महत्त्वाची कागदपत्रे यांची जप्ती केली. जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये घायवळच्या मालकीच्या मालमत्तांचे सातबारे, साठेखत, तसेच मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाइल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी घायवळच्या बेकायदेशीर बांधकामे आणि मालमत्तांविरोधात कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेला अधिकृत पत्र पाठवले आहे. महापालिका प्रशासनाने कारवाईसाठी आवश्यक ती कायदेशीर तयारी सुरू केली आहे. अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या संपत्तीवर सील आणि जप्तीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.


आतापर्यंतच्या तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून विदेशात पलायन केले आहे. पुणे पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच घायवळच्या नावावरील बँक खाती गोठवण्याचे आणि बेकायदा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.


कोथरुड गोळीबारानंतर घायवळ विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातील संघटीत पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारीविरोधात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी विना परवाना शस्त्रास्त्र बाळगणे, गोळीबारासाठी जिवंत गोळ्यांचा साठा बाळगणे या प्रकरणात निलेश घायवळ विरोधात गुन्हा नोंदवला आहे. घायवळ विरोधात कलम १०९, ३५१, ३५२, १८९(१), १८९(२), १९०, १९१, २११, ११३(५) तसेच शस्त्रास्त्र कायदा कलम ३(२५), ३७(१)(३), १३५ व महासुरक्षा कायदा कलम ३(१), ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

Ex Date Expiry: आजच्या 'या' ४ कंपन्यांच्या लाभांश, Corporate Actions एका क्लिकवर -

१:१० स्टॉक स्प्लिट,२० रुपये लाभांश, १:१ बोनस इश्यू, राईट्स इश्यू - अनेक कंपन्यांनी आज शेअर्सवरील लाभांश

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

Tata Capital IPO Day 1: दिग्गज Tata Capital IPO मैदानात ! सकाळपर्यंत आयपीओला 'इतके' सबस्क्रिप्शन जीएमपीसह.. Returns साठी हा आयपीओ खरेदी करावा का जाणून घ्या सविस्तर

मोहित सोमण:आजपासून टाटा कॅपिटल लिमिटेड आयपीओ मैदानात दाखल होत आहे. आयपीओपूर्वी कंपनीने ४६४१.८३ कोटीचा निधी अँकर

Top Stock to buy: भरघोस कमाईसाठी 'हे' १६ शेअर लवकर खरेदी करा ! मोतीलाल ओसवासचा सल्ला! जाणून घ्या फंडांमेटल विश्लेषणासह

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या संबंधित शेअर्सला बाय कॉल दिला आहे. जाणून घेऊयात नक्की त्यांनी आपल्या