Apple Pay : लवकरच भारतात होणार 'ऍपल पे' लाँच

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Apple Inc. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऍपल पे’ (Apple Pay) ही सेवा भारतात लाँच होण्याची शक्यता असून, ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जून-जुलै २०२६ पर्यंत ती अधिकृतपणे सुरू होऊ शकते. भारतातील आयफोन वापरकर्त्यांसाठी ही मोठी बातमी मानली जात आहे.


सध्या भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात गुगल-पे, फोन-पे आणि पेटीएम यांसारख्या ऍप्सचं वर्चस्व आहे. मात्र ‘ऍपल पे ’ आयफोन आणि ऍपल वॉच वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीय पर्याय ठरू शकतो. ही सेवा ‘टोकनायझेशन’ तंत्रज्ञानावर आधारित असून व्यवहार करताना प्रत्यक्ष कार्ड क्रमांक शेअर केला जात नाही, त्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत राहते. एनएफसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहक दुकानांमध्ये ‘टॅप-टू-पे’ पद्धतीनं सहज व्यवहार करू शकतील. याशिवाय ऑनलाइन खरेदी आणि विविध ऍप्समधील पेमेंट्सही सुलभ होतील. फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे प्रमाणीकरण केल्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे.


भारतात सेवा सुरू करण्यासाठी ऍपलने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांशी तसेच व्हिसा आणि मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्कशी चर्चा सुरू केली आहे. तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतही प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.


भारतीय नियमांनुसार डेटा लोकलायझेशन आणि यूपीआय एकत्रीकरण महत्त्वाचे असल्याने सुरुवातीला कार्ड-आधारित संपर्करहित पेमेंट्स सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यूपीआय सेवा जोडली जाऊ शकते. भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा वेग झपाट्याने वाढत असताना ‘ऍपल पे’ची एन्ट्री स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे. सेवा सुरू झाल्यास आयफोन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुविधाजनक पेमेंट अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Ahilyangar Crime : ‘पैसे अन् सोनं सिद्ध करून देतो’ म्हणत महिलेची 45 हजारांची फसवणूक, भोंदू साधू गजाआड

Ahilyangar Crime : ‘पैसे आणि सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत महिला व्यापाऱ्याची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक