मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे मास्टर प्लॅन असून, त्यांच्याकडून तिकीटवाढीशिवाय मेट्रोच्या जागेत जाहिराती लावणे, स्थानकातील जागा भाड्याने देणे, अशा अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सदर पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.


मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा म्हणून एमएमआरडीए आणि रिलायन्सने खासगी-सार्वजनिक भागिदारीतून सुमारे ११ किलोमीटर लांबीची घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिका २०१४ मध्ये कार्यान्वित केली आहे.


या मेट्रो मार्गिकेने दररोज जवळपास पाच लाख मुंबईकर प्रवास करत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तरीही मेट्रो तोट्यात धावत आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि मेट्रो-वन प्रशासन तिकीट वाढवण्याबाबत विचार करत होते, मात्र तो पर्याय मागे पडला असून, एमएमआरडीएने आता तिकिटाशिवाय इतर मार्गाने उत्पन्न कसे वाढवता येईल, त्याबाबत विचार सुरू केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.त्याबाबत अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे अभ्यास गटाकडून काय अहवाल येणार, त्यात काय बाबी समोर येतील, त्यावर पुढील निर्णय ठरणार आहे.

Comments
Add Comment

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा

फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या