Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलांचा मुद्दा चर्चेत आला आहे.


बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी नागरिक मतदान करणार आहेत. निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सध्याच्या विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपतो.


पूर्वी अनेक राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली येथे बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलांवरून वाद निर्माण झाले होते. कधी मतदारांची ओळख पटवण्याबाबत शंका निर्माण झाली, तर कधी राजकीय पक्षांमध्ये वाद झाले. काही प्रकरणं थेट न्यायालयात गेली होती.


सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, मात्र ती प्रभावीपणे लागू होणे कठीण गेले. यामुळे बुरखा परिधान करणाऱ्या महिलांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि काही वेळा त्यांची गोपनीयताही धोक्यात आली होती.


मात्र यावेळी निवडणूक आयोगाने एक नावीन्यपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाने स्पष्ट केले की, प्रत्येक मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविका तैनात करण्यात येणार आहेत. या महिला स्थानिक आणि ओळखीच्या असतील. त्यांची जबाबदारी बुरखा घालून आलेल्या महिलांची ओळख तपासण्याची असेल. जर कोणावर शंका आली, तर त्या सेविका संबंधित महिलेची ओळख पाठवण्यास मदत करतील.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी जर कोणावर शंका घेतात, तर ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख तपासण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकारी आणि पोलिंग एजंटलाच असतो. उमेदवाराला स्वतः याबाबत तपासणी करण्याचा अधिकार नाही.


सध्या बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार आहेत, आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १४ लाख नागरिक प्रथमच मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण ९०,७१२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. ही केंद्रे राज्यातील मतदारांना सहज आणि सुरळीत मतदान करता यावे, यासाठी तयार करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या

क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा

बिहारमध्ये आज मतदान

पहिल्या टप्प्यात अनेक मातब्बरांचे भविष्य मतदानपेटीत बंद होणार नवी दिल्ली  : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी

बिहार मतदान: लोकशाहीच्या उत्सवाचा आज पहिला टप्पा, मतदान करण्यासाठी मोदींनी केले आवाहन!

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या