Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब पटकावला. या यशाबद्दल त्याला सुमारे १३ लाख रुपये रोख रक्कम आणि Haval H9 SUV कार अशी खास बक्षीसे मिळाली. त्याच्या विजयाच्या क्षणी, अभिषेक आपल्या जवळच्या मित्रासोबत आणि संघाच्या उपकर्णधार शुभमन गिलसोबत गाडीच्या सेल्फीमध्येही झळकला.


मात्र, या बक्षिसाबाबत एक गमतीशीर अडचण समोर आली आहे. Haval H9 ही SUV डाव्या बाजूला स्टिअरिंग असलेली आहे, आणि भारतात केवळ उजव्या स्टिअरिंगच्या गाड्यांनाच परवानगी आहे. त्यामुळे सध्या अभिषेक भारतात ही गाडी कायदेशीररित्या वापरू शकत नाही. मात्र, ही समस्या लक्षात घेत कार निर्मात्यांनी उजव्या हाताने चालवता येईल असे खास मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून भारतीय खेळाडूंना ही गाडी प्रत्यक्ष वापरता येईल.


Haval H9 SUV ही एक लक्झरी कार असून, २०१४ मध्ये बीजिंग ऑटो शोमध्ये तिचा पहिला लूक सादर झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीची किंमत अंदाजे $29,000–$37,000 दरम्यान असून, भारतात तीची किंमत सुमारे २५ लाख आहे.


अभिषेकने सात सामन्यांत ४४.८६ च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राइक रेटने एकूण ३१४ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३२ चौकार आणि १९ षटकार झळकले, आणि त्याने तीन अर्धशतकेही ठोकली. डावखुरा असूनही त्याने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांवर मोठ्या आत्मविश्वासाने हल्ला केला, ज्यामुळे भारताला अनेक वेळा उत्कृष्ट सुरुवात मिळाली.


श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला पायात क्रॅम्प आल्यामुळे तो संपूर्ण क्षेत्ररक्षण करताना बाहेर बसावं लागला, आणि याचा थोडाफार परिणाम पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही दिसून आला. अंतिम सामन्यात तो फारसा चमकू शकला नाही, पण संपूर्ण स्पर्धेतील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी भारताच्या विजयानंतर चर्चेचा विषय ठरली.


आता भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी तयारी सुरू आहे आणि अभिषेक शर्मा त्याच्या फॉर्मला पुढे नेण्याच्या तयारीत आहे. घरच्या मैदानात खेळताना तो पुन्हा एकदा तुफानी प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी

भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश

दोहा : भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.