ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे रविवारी एका खासगी समारंभात एकत्रित दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या पत्नी आणि मुलासह या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, राज ठाकरे हेही सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. काही वेळातच उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल झाले आणि दोन्ही बंधूंमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता रंगू लागल्या आहेत.


आजचा हा कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथील एमसीए क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या आधीच बाहेर पडले आणि काही मिनिटांतच ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील मातोश्रीवर पोहोचले.


?si=vNRCJx5SsjNCwBq4

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बंधूंमधील चर्चा ‘मातोश्री’च्या पहिल्या मजल्यावर शांत वातावरणात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांसंदर्भात संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे.


यापूर्वीही ५ जुलै २०२५ रोजी दोन्ही बंधू एकत्र मराठी भाषा समारोहाच्या मंचावर आले. २७ जुलै २०२५ राज ठाकरे ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 10 सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले, त्या वेळी संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांत ही पाचवी भेट असल्याची माहिती आहे. या वाढत्या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याची शक्यता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.



Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या