शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावर्षी साईबाबांच्या पुण्यतिथीला एका भक्ताने चक्क १ कोटींचा हार साईचरणी अर्पण केला आहे. त्या भक्ताने स्वतःचे नाव जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याचे नाव अजूनही गुप्तच आहे. हा आंध्रप्रदेशातील साईभक्त आहे. त्याने ९४५ ग्रॅम वजन असेल हार साईबाबांना अर्पण केला.
दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येतात. दर्शनाला आलेले भाविक यथाशक्ती दानधर्म करतात. अनेक भाविक मौल्यवान वस्तू किंवा दागिने अथवा मोठी रक्कम साईचरणी अर्पण करतात. मुक्त हस्ताने दान करणारे भक्त हे शिर्डीला दरवर्षी बघायला मिळतात. या वर्षी आंध्रप्रदेश मधील भक्ताने १ कोटींचा हार साईबाबांना अर्पण केला आहे.
हा मौल्यवान हार फक्त वजनानेच नाही तर दिसायला सुद्धा भारदस्त आहे. या हारात हिरे, माणिक मोती आहेत. हाराची बाजारातील किंमत १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० इतकी आहे. हा हार नवरत्नांचा आहे, तो शिर्डीचे मुख्य कार्यकर्ते अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला.