पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान


कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत सर्वबाद २४७ धावा केल्या. पाकिस्तानपुढे जिंकण्यासाठी २४८ धावांचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ५९ धावांनी जिंकला. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारताचा दुसरा साखळी सामना आहे. हा सामना जिंकल्यास चार गुणांसह भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ तीन गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तीन गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात पहिल्या स्थानी आहे.



भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यष्टीरक्षक रिचा घोष ३५ धावा करुन नाबाद राहिली. जेमिमा रॉड्रिग्जने ३२ आणि प्रतिका रावलने ३१ धावा केल्या. दीप्ती शर्माने २५, स्मृती मंधानाने २३, स्नेह राणाने २० धावा केल्या. कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरने १९, क्रांती गौडने ८, श्री चरणीने १, रेणुका सिंग ठाकूरने शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने चार, कर्णधार असलेल्या फातिमा सना आणि सादिया इक्बालने प्रत्येकी दोन तर रमीन शमीम आणि नशरा संधूने प्रत्येकी एक बळी घेतला.



भारतीय महिला क्रिकेट संघ : प्रतिका रावल , स्मृती मानधना , हरलीन देओल , हरमनप्रीत कौर (कर्णधार) , जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक) , दीप्ती शर्मा , स्नेह राणा , रेणुका सिंग ठाकूर , क्रांती गौड , श्री चरणी


पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ : मुनीबा अली , सदाफ शमास , सिद्रा अमीन , रमीन शमीम , आलिया रियाझ , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक) , फातिमा सना (कर्णधार) , नतालिया परवेझ , डायना बेग , नशरा संधू , सादिया इक्बाल


Comments
Add Comment

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन