अमित शाहांचा अहिल्यानगर दौरा, रात्री बंद दाराआड मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा


शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी अमित शाहांचे शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा आगमन झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर रात्री उशिरा अमित शाह यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली.


अमित शाहांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पावसाची सध्याची स्थिती, पावसामुळे झालेले नुकसान याची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, पुढील आठवड्यात नियोजित असलेल्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण कार्यक्रम आणि मेट्रो तीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांचाही आढावा घेतला. काही राजकीय मुद्यांवरही चर्चा झाली. पण चर्चेचे तपशील अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. यामुळे चर्चेबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजय विखे पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतही बंद दाराआड चर्चा झाली आहे.


Comments
Add Comment

Food poisoning from Aamras : पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

अहिल्यानगर : मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी काही

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

दादर ते सिद्धिविनायक थेट 'बेस्ट' बससेवा

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

नवी मुंबईतील एनआरआय वेटलँडमध्ये फ्लेमिंगो संरक्षणासाठी इशारा फलक, पर्यटकांसाठी कडक नियम लागू

नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय वेटलँड परिसरात फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने