दादर ते सिद्धिविनायक थेट 'बेस्ट' बससेवा


मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा आणि खिशाला परवडणारा होणार आहे. दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान थेट सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नवीन बसमार्ग क्र. 'ए-८१४' (सिद्धिविनायक फेरी) चा भव्य लोकार्पण सोहळा शनिवारी (२३ मे) पार पडला. या नव्या बससेवेमुळे दादर स्थानकावर उतरून मंदिराकडे जाणाऱ्या मुंबईसह परराज्यातील भाविकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत या मार्गावर थेट बससेवा नसल्याने भाविकांना महागड्या टॅक्सी प्रवासावर अवलंबून राहावे लागत होते.


सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या विशेष पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला बेस्ट समितीच्या माजी अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, विश्वस्त मीनाताई कांबळे यांच्यासह बेस्टचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाविकांना फायदा

उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, दादर हे मुंबईचे मुख्य रेल्वे केंद्र असल्याने हजारो भाविक याच स्थानकावरून सिद्धिविनायकाकडे जातात. मंगळवार, अंगारकी चतुर्थी आणि शनिवार-रविवार सुट्ट्यांच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, ही थेट 'फेरी बससेवा' भाविकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणारी ठरेल. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या गरजेची दखल घेत अवघ्या काही महिन्यांत हा मार्ग प्रत्यक्ष सुरू केल्याबद्दल मंदिर न्यास आणि भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध