नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर


राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार :


राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.


प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.


राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाची आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार आहे. नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत सोमवारी मंत्रालयात काढली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणूक पूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होण्याची तारीख निश्चित झाली आहे.


राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नगर परिषद, नगरपंचायतींची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी