महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश


मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्रं मिळवण्याची प्रक्रिया वेगाने करावी. या प्रकल्पाच्या रस्ता रेषेने बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनींचे संपादन जलदगतीने करावे, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले.


मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ (ब) मधील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील जुळे बोगदे प्रकल्प स्थळ तसेच मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्प स्थळास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज ए, बी आणि सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. उपायुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रकल्प सल्लागार या पाहणी दौऱ्यास उपस्थित होते.



गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत रस्ता संरेखनाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर गगराणी यांनी चर्चा केली. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी आदी उपयोगिता वाहिन्यांची तजवीज देखील बोगद्याखाली करण्यात आली आहे. या सर्व बाबींची सविस्तर माहिती महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी घेतली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.


दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत जुळ्या बोगद्याच्या कामासाठी अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्र दाखल झाले आहे. बोगदा खोदणाऱ्या संयंत्राचे सुटे भाग जपानहून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या टीबीएमचे भाग डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत लॉन्चिंग शाफ्ट खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत साडेतीन मीटर खोल शाफ्ट खोदण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


या पाहणीनंतर गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्पांतर्गत चारकोप स्थळास प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज बी, सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. रस्ता संरेखनाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर गगराणी यांनी चर्चा केली.


पश्चिम उपनगरातील मालाड मरिना एन्क्लेव्ह, चारकोप येथील सेक्टर ८, गोराई क्षेपणभूमी, गोराई खाडी परिसर, एक्सर मेट्रो स्थानक परिसर, कांदळपाडा मेट्रो स्थानक परिसर, दहिसर (पश्चिम) येथील आनंद पार्क या ठिकाणांवरील कामांचा आढावा त्यांनी घेतला. विशेषतः सुटे भाग निर्मिती (कास्टिंग यार्ड) करिता जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते यांची सविस्तर माहिती गगराणी यांनी घेतली.


Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट