प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील माहितीनुसार,एचडीएफसी बँक लिमिटेडच्या एकूण कर्जांमध्ये २०२६ च्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ९.९% वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने ही संबंधित माहिती दिली आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या मुदत ठेवी १२.१% वाढून २८.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर एचडीएफसी बँकेच्या चालू खाते-बचत खात्यातील (C ASA) ठेवी ७.४% वाढून ९.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीत बँकेने एकूण कर्ज म्हणून २५.१९ लाख कोटी रुपये नोंदवले होते, तर मुदत ठेवी (Term Deposits) २५ लाख कोटी रुपये होत्या. तर बँकेने ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत २६.५३ लाख कोटी रुपयांचे एकूण कर्ज दिले होते, तर मुदत ठेवी २७.६४ लाख कोटी रुपयांच्या होत्या. एप्रिल-जून कालावधीसाठी कासा (Current Account Saving Account CASA) ठेवी ९.३ लाख कोटी रुपयांचा असून मागील वर्षीच्या कालावधीसाठी ८.८३ लाख कोटी रुपये होत्या असे बँकेने आपल्या आकडे वारीत स्पष्ट केले.
नेमक्या शब्दात बँकेने म्हटले आहे की,' दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत बँकेचे निकाल बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन असतील' जास्त तरतुदी असूनही (Additional Provisions) बँकेने आर्थिक वर्ष २०२६ च्या आर्थिक व र्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1) निकालानुसार स्वतंत्र निव्वळ नफ्यात चांगली वाढ नोंदवली होती जी तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा अधिक होती. बँकेच्या करोत्तर नफा (Profiit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १२% वाढून १८१६० कोटी रुपयांच्या घरात पो होचली होती. पहिल्या जून तिमाहीच्या अखेरीस मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality) थोडीशी खराब झाली कारण गेल्या तिमाहीत एकूण अनुत्पादक मालमत्तेचे (Total NPA) प्रमाण १.४% पर्यंत वाढले, जे मागील तिमाहीत १.३३% होते. मार्च तिमाहीत निव्वळ एनपीए (Non Performing Assets NPA) ०.४३% वरून ०.४७% वाढले. शिवाय, ऑपरेशनल परफॉर्मन्स फ्रंटवर एचडीएफसी बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वर्षानुवर्षे ५% वाढून ३१४३८ कोटी रुपये झाले.शुक्रवारी एचडीएफसी शेअर ०.१६% घसरल्याने प्रति शे अर किंमत ९६३.७० रूपयांवर स्थि रावली आहे.