सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दक्षिण मुंबईतील खाडिलकर रोड येथे ही दुर्घटना घडली. दरम्यान, या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा अनुचित प्रकार घडला असता.
आग तात्काळ रोखण्यात आल्याने सिलेंडरचा ब्लास्ट झाला नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्टॉलला लागलेली आग विझवली तसेच घटनास्थळी पाहणी केली.