कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी

माजी आमदार सुभाष भोईर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कल्याण-शिळ महामार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्याचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्राद्वारे केली आहे. त्यावेळी कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील असे सांगितले आहे.


कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण-शिळ महामार्गावरून नवी मुंबई औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये - जा करीत असतो. या महामार्गावर रुग्णवाहिका देखील तासनतास अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या महामार्गावर दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार व व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.


त्यामुळे कल्याण शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच महापे रस्ता आणि वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंतची वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण