ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं लक्ष लागलं होतं ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे.. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या भाषणात युतीची मोठी घोषणा होईल, असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. युतीची गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुटण्याऐवजी, युतीआधीच ती 'ब्रेक' झालीये. कारण, युतीच्या घोषणेपूर्वीच मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय.


दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची स्पष्ट घोषणा केली नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की, 'मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, एकत्रच राहू.' 'युती झाली' किंवा 'युती करणार' असं ठोस विधान त्यांनी केलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. युतीची घोषणा होईल, अशी चर्चा असतानाही राज ठाकरे शिवाजी पार्कच्या जवळ घर असूनही मेळाव्याला हजर राहिले नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की, राज ठाकरे अजूनही 'वाट पाहा आणि अंदाज घ्या' या भूमिकेत आहेत.


?si=RhQBhU6mD6EC-ZnN

राज ठाकरेंची ही संदिग्ध भूमिका का ? कारण दोन आहेत. पहिलं म्हणजे जागावाटपाचा तिढा.. ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना एकसारख्याच मराठीबहुल मतदारसंघात इंटरेस्ट आहे. मागच्या वेळेस शिवसेनेने जिंकलेल्या जागा मनसेला हव्या असू शकतात. हा जागावाटपाचा तिढा सुटल्याशिवाय राज ठाकरे युतीला वचन देणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे भाजपसोबतचे संबंध.. राज ठाकरेंचे भाजप आणि त्यांच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध देखील या निर्णयावर परिणाम करत आहेत. भाजपला वाटतंय की ते अजूनही राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यापासून रोखू शकतात.


या परिस्थितीत, गमावण्यासारखं उद्धव ठाकरेंकडेच अधिक आहे. राज ठाकरे 'इप्सित हिस्सा' मागणारच आणि तोपर्यंत ते 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेणार. यामुळे युतीची घोषणा होण्याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलंय. 'हिंदी सक्तीच्या विरोधात' ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हालचालींना वेग आला. पण, आता खुद्द महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू झालीये.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी 'मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार' असा विश्वास व्यक्त केला होता. तर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट घोषणा केलीय की, 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार.' यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सारवासारव करत, "कार्यकर्त्यांना जिद्दीने लढायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक पक्ष असा विश्वास देतो," असं म्हटलंय. पण खरं सांगायचं तर, युती होण्यापूर्वीच महत्त्वाच्या पदांवरून असे जाहीर दावे होणं, हे महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी धोक्याची घंटा आहे.


युती झालीच तर महापौर कोणाचा? स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे? यावर आता ठाकरेंच्या युतीचं भवितव्य ठरणार आहे. भाजपने एकीकडे 'महायुती' होणार असल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत हे अंतर्गत वाद सुरू आहेत. याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला नक्कीच होणार आहे. ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच जर महापौरपदावरून एवढी रस्सीखेच सुरू असेल, तर भविष्यात जागावाटपाचा आणि इतर पदांचा तिढा कसा सुटणार? अशा उलटसुलट चर्चा आता सुरु आहेत.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना

Extremely Severe Alert : मोबाईलवर ‘Extremely Severe Alert’! भारत सरकारची नवी आपत्ती सूचना प्रणाली चाचणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

Property Tax थकीत बिलाच्या रकमेवरील दंड २ टक्क्यांऐवजी १ टक्का ?

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले संकेत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांना महापालिकेच्यावतीने

BMC Budget : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प रेकॉर्डब्रेक चर्चेनंतर मंजूर

एकूण ९४ तास झाली चर्चा, तब्बल १८८ नगरसेवकांनी घेतला सहभाग सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपण केल्यामुळे