Property Tax थकीत बिलाच्या रकमेवरील दंड २ टक्क्यांऐवजी १ टक्का ?

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले संकेत


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांना महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा विलंबाने झाल्याने त्या थकीत बिलाच्या रकमेवर दोन टक्के व्याज आकारले जाते. परंतु, हा दोन टक्के व्याचा भूर्दंड सर्वसामान्य जनतेवर पडत असल्यामुळे भविष्यात ही थकबाकीच्या रकमेवर आकारण्यात येणारी व्याजाची रक्कम एक टक्का एवढी करण्याचा विचार केला जात असल्याचे संकेत महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, तसेच थकीत बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी करधारकांना सवलत देण्यासाठी अर्ली बर्ड योजना राबवण्याचाही विचार केला जाईल,असेही भिडे यांनी स्पष्ट केले.


मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पीय चर्चेत समारोपाच्या चर्चेत गुरुवारी निवेदन करताना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी २६ महापालिकेच्या विभाग व खात्यांसंदर्भातील सूचना तसेच समस्यांबाबत आपले विचार मांडले. यावेळी बोलतांना भिडे यांनी आतापर्यंत १७०० पेक्षा अधिक किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले असून रस्ते गुणवत्ता प्रक्रियेतही बदल केले जात आहेत. दहिसर भाईंदर हा विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्प महापालिकेच्यावतीने केला जाणार आहे. सन २०२९पर्यंत तो पूर्ण केला जाईल.


मुंबईत कचऱ्या एवढा दिवसाला डेब्रीज गोळा होत असून दिवसाला ८ हजार मेट्रीक टन डेब्रीज गोळा होते. त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात आहे.


मुंबईत सफाई कामगारांसाठी ५५१२ सेवा निवासस्थाने असून आश्रय योजनेंतंर्गत १२ हजार सदनिका प्राप्त होणार आहेत. त्यामुळे सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने दिल्यानंतर मग त्यांना कायम घर देण्याचा विचार केला केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत बोलतांना यासाठी स्वतंत्र समिती बनवण्याचा विचार केला जाईल. पण यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर कार्यवाही केली जात असून मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई करण्यासाठी २४ भरारी पथके तैनात करण्यात आल्याचेही सांगितले.


आपत्कालिन व्यवस्थापनाबाबत बोलतांना भिडे यांनी नगरसेवकांनाही आता आपत्कालिन प्रशिक्ष तसचे नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण दिले जाईल असे सांगितले तसेच मुंबईत ६० ठिकाणी सायरन लावण्यात आल्याचेही सांगण्यात आले.


मुंबईतील विकास आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरजी आणि पीजी भूखंडा प्राप्त व्हावे यासाठी आयओडीमध्ये अटींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आरक्षणे प्रभावी प्राप्त व्हावी यासाठी नियोजन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंबईतील २२ कोळीवाडे आणि ६४ कोळीवाडे यांच्या विकासासंदर्भात डिसीआर ३३ (१६ )(५)अंतर्गत वेगवेगळे निर्देश देण्यात आले असून यातून महापालिकेचाही महसूल वाढेल. मासळी सुकवण्याची जागा, तसेच इतर जागांचा वापर याबाबतही विचार करण्यात येईल. म्हाडा, एसआरएच्या अनेक पुनर्विकास प्रकल्पात थकीत रक्कम असून अशाप्रकारच्या प्रकल्पांना करनिर्धारण व संकलन विभागाची एनओसी असल्याशिवाय ओसी देण्यात येवू नये अशा अटींचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले.


शाळांचा दर्जा वाढवण्याबाबत मी स्वत: उपायुक्त शिक्षण यांच्यासोबत समन्वय राखून लक्ष ठेवत आहे. त्यामुळे जिथे शाळा नाही तिथे शाळा उभारण्याचा विचार केला जाईल,असेही सांगितले.


गारगाई पाणी प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करणे यासही मल जल प्रक्रिया केंद्रातून पुनर्वापरासाठी प्राप्त होणारे पाणी उपलब्ध होईलच. पण पाणी गळती व चोरी ही मोठी समस्या असून त्यावर विशेष लक्ष शास्त्रोक्त काम केले जाईल. खासगी प्लंबरचा प्रश्न आहे, ते बंद केले जातील. तसेच नवीन जलजोडणीत अनेक अडचणी येत असल्याने त्याबाबत सुधारणा करण्याचा विचार केला जाईल.


उद्यानांमध्ये फिडींग सेंटर बनण्याबाबत कार्यवाही केली जाईल तसेच शौचालयांचीही उभारणीकडे भर दिला जाईल.


नियोजन विभागाच्यावतीने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजनेचा लाभ सन २०२६-२७ पासून दिला जाईल असे स्पष्ट करत भिडे यांनी महिलांना १लाख रुपयांचे अनुदान देण्याचाही विचार केला जाईल असे सांगितले. त्यामुळे सर्वच सदस्यांनी केलेल्या सूचना आणि मांडलेले प्रश्न पुरेपूर उत्तमपणे टीमवर्कद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे हा संकल्प या सभागृहातून जातान करत आहे असे सांगत यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचीही भावनिक सादही त्यांनी यावेळी नगरसेवकांना घातली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –

Devendra Fadnavis : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुन्हा सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मुंबई : "महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्षांची उज्ज्वल परंपरा

Devendra Fadanvis : मुंबई, ठाणे, कोकणाला पावसाने झोडपले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील