रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा


मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. यामुळे आयात निर्यात असंतुलन निर्माण झाले आहे. हे असंतुलन दूर करण्यासाठी रशियाने भारताकडून औषधे, कृषीमाल यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतीय औषधांवरील टॅरिफमध्ये वाढ केली. यामुळे भारतीय औषधे अमेरिकेत महाग झाली. भारताच्या अमेरिकेतील औषध विक्रीत घट होऊ लागली. पण रशियाने घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेत होत असलेला तोटा भरुन काढण्याची संधी भारतीय औषध कंपन्यांना मिळणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारतातून विविध वस्तू आणि सेवांची आयात वाढवण्यासाठी लवकरच आणखी निर्णय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सोची येथे वालदाई डिस्कशन क्लबमध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीत पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदी कायम देशहिला सर्वोच्च प्राधान्य देतात. ते देशाचा फायदा तोटा याचा हिशेब मांडून नंतर निर्णय घेतात. कोणाच्या दबावाला बळी पडून निर्णय घेणे किंवा निर्णय बदलणे हा मोदींचा स्वभाव नाही; असे पुतिन यांनी मोदींविषयी बोलताना सांगितले.


भारत दर महिन्यात रशियातून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. हे तेल भारतीय रिफायनरीत नेले जाते यानंतर शुद्ध केलेले तेल भारत युरोपला विकतो. या व्यवहारातून रशिया, भारत आणि युरोपमधील देश या सर्वांनाच फायदा होत आहे. यामुळेच हा व्यापार सुरू आहे. अमेरिका विकत असलेले तेल महाग आहे. हे तेल खरेदी करणे जगातील अनेक देशांना कठीण आहे. पण भारताने दिलेल्या पर्यायामुळे जगातील अनेक देश त्यांची उर्जेची गरज पूर्ण करू शकतात. भारत तेलाच्या व्यापारातून फायदा घेत असला तरी कोणत्याही देशाची फसवणूक करत नाही किंवा कोणालाही लुबाडत नाही, असे पुतिन म्हणाले. अमेरिकेचे शस्त्र विक्री आणि तेल विक्रीचे धोरण फसवे आणि दुटप्पी आहे. या धोरणाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असेही पुतिन म्हणाले.


भारत आणि रशिया यांच्यात सोवियत रशिया असल्यापासून मैत्री आहे. या मैत्रीला मोठा इतिहास आहे. किरकोळ फायद्यातोट्याच्या गणितावर ही मैत्री अवलंबून नाही; असे पुतिन म्हणाले. त्यांनी भारत एक विश्वासू मित्र असल्याचे सांगितले.


Comments
Add Comment

अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एआयचा वापर

आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओळखणार रस्त्यांवरील रेलिंग, रस्त्यांचे चिन्ह न्यू यॉर्क : अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त

शेख हसीनांना फाशी होणार ? मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत आज अंतिम निकाल, बांगलादेश हाय अलर्टवर

ढाका(बांग्लादेश): ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेश हादरवून टाकणाऱ्या विद्यार्थी चळवळीदरम्यान झालेल्या अशांततेशी

मेक्सिकोमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध हजारो जेन-झी रस्त्यावर; १२० जखमी

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये वाढत्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराविरोधात ‘जेन-झी’ च्या आवाहनावर

कोमातील मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी आईची ‘डान्स थेरपी’

बीजिंग : चीनमधील एका आईने आपल्या कोमात असलेल्या मुलीला १० वर्षे रोज नृत्य करवून चमत्कारिकरीत्या बरे केले आहे.

स्थानिकांच्या रोजगारासाठी ट्रम्प यांचे नवीन ‘एच-१ बी’ व्हिसा धोरण

विधेयक मंजूर झाल्यास ७० टक्के भारतीयांना फटका बसण्याची भीती न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या

पाकिस्तानात ‘सुप्रीम’चे न्यायाधीश लष्करप्रमुखांच्या विरोधात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली