IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी शतकी खेळी करत टीम इंडियाला जबरदस्त आघाडी मिळवून दिली.


वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १६२ धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट गमावून ४४८ धावा केल्या आणि २८६ धावांची मोठी आणि निर्णायक आघाडी घेतली आहे.१ बाद १२१ धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात करणाऱ्या राहुलने आपले ११वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने संयमी फलंदाजी करत १०० धावा (१९७ चेंडू, १२ चौकार) केल्या आणि संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. कर्णधार शुभमन गिलनेही राहुलला चांगली साथ दिली आणि ५० धावा (१०० चेंडू, ५ चौकार) करत दमदार अर्धशतक झळकावले. त्याने आणि राहुलने तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. गिल रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बाद झाला.



ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक


केएल राहुल बाद झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सांभाळला. ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. तो १५ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावा करून बाद झाला.



जडेजाचा शतकी धमाका


एकाच डावात भारताकडून हे तिसरे शतक होते. अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपला शानदार फॉर्म कायम ठेवत दमदार शतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जडेजा १०४ धावांवर (नाबाद, १७६ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार) आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होते.


ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.

Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा