जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने दाखवलेले शौर्य आणि पराक्रम पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला. या खंडा स्पर्धेदरम्यान, एका स्पर्धकाने केवळ चार मिनिटांमध्ये तब्बल ४२ किलो वजनाची खंडा तलवार डोक्यावरून ९० वेळा फिरवून एक विक्रमच प्रस्थापित केला. ही ४२ किलोची जड तलवार एका वेळी फिरवतानाही अनेकांची दमछाक होते. मात्र, या स्पर्धकाने दाखवलेला दमदार स्टॅमिना आणि कौशल्य वाखाणण्याजोगे होते. या अविश्वसनीय पराक्रमामुळे या स्पर्धकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि खंडोबाच्या गडावर जय भवानी-जय मल्हारच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough Syrup) मोठी दुर्घटना घडली आहे. या सिरपचे ...
खंडा स्पर्धेमध्ये केवळ तलवार फिरवणे एवढेच नव्हे, तर अनेक मर्दानी कसरती सादर करण्यात आल्या. या स्पर्धेत प्राचीन युद्धकला आणि शारीरिक बळ यांचे प्रदर्शन करण्यात येते. यामध्ये तलवार एका हाताने तोलून धरणे, तलवारीला घेऊन वेगवेगळ्या शारीरिक कसरती करणे, जोर काढणे (पुशअप्स) आणि युद्धामध्ये ज्या पद्धतीने तलवार फिरवली जाते, त्या युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवणे असे अनेक रोमांचक प्रकार सादर झाले. जेजुरीच्या या खंडा स्पर्धेमुळे मर्दानी दसरा उत्सवाला एक ऐतिहासिक आणि साहसी किनार मिळाली असून, प्राचीन युद्धकला जतन करण्याची परंपरा आजही कायम असल्याचे यातून सिद्ध होते.