राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द



मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी दरम्यान दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदा केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेले निर्णय नवरात्रीपासून लागू झाली आहे. आता पाच आणि अठरा टक्के असे जीएसटीचे दोनच टप्पे अस्तित्वात आहेत. जीएसटीचे बारा आणि अठ्ठावीस टक्के हे दोन टप्पे रद्द करण्यात आले आहेत. शैक्षणिक साहित्य, निवडक औषधे आणि निवडक दुग्धजन्य पदार्थ आदींवर शून्य टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. इतर ज्या वस्तू आणि सेवांवर आधी बारा टक्के जीएसटी होता त्यांच्यावर आता पाच टक्के जीएसटी आहे. तसेच ज्या ज्या वस्तू आणि सेवांवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता त्यांच्यावर आता बारा टक्के जीएसटी आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या आहेत. या नंतर आता पुराच्या निमित्ताने राज्यातली एसटी भाडेवाढ रद्द झाली आहे. या दोन निर्णयांमुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

मुंब्रा,कुर्ल्यात ATS छापे; 'अल्-कायदा' लिंकचा संशय!

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संशयित मूलतत्त्ववादी गतिविधींच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी मुंब्रा

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

Central Railway : लोकलची 'लेटलतिफी' आता बंद! मध्य रेल्वेवर लवकरच लोकल 'सुसाट' धावणार, जबरदस्त प्लॅन नेमका काय?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ मुंबई (सचिन धानजी)  मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर