पारंपरिकतेला फॅशनचा ट्विस्ट

दिवस सणांचे भरपूर शॉपिंगचे ... दिवाळी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आहे. नवरात्र संपत आलीय आणि दिवाळीच्या तयारीची घाई सुद्धा सुरु झालीय.. अनेकांचं शॉपिंग अजूनही बाकी असेल शिवाय दिवाळीत काय शॉपिंग करायचंय याची लिस्ट करायची असेल. दिवाळी म्हटल्यावर मग नवीन कपडे, दागिने, सजावटीच्या वस्तू, कंदील, भेटवस्तू असं बरंच काही असतं. दिवाळीचा सण केवळ आनंदाचा नसतो तर नातेवाईकांसोबत चार सुखाचे क्षण देणारा असतो. मग अशा या खास क्षणांना नवीन फॅशन आणि स्टायलिंगची जोड तर हवीच. चला मग २०२५ मध्ये दिवाळीसाठी आलेले काही नवीन ट्रेंड्स पाहूयात....

रंगांची निवड


आयव्हरी आणि शॅम्पेन शेड्स




२०२५ मध्येही आयव्हरी आणि शॅम्पेन सारख्या प्लेन शेड्सना लोकांची पसंती मिळत आहे. यात असणारे मेटॅलिक शेड्स पारंपरिक कपड्यांना एक नवा लूक देतात.
कुठे वापरू शकाल ? : दिवाळी पार्टी, सध्या कौटुंबिक भेटीसाठी हा पर्याय उत्तम

ड्रेसिंग ट्रेंड्स


केप लेहंगा




पारंपरिक लेहग्यांना ट्वीस्ट देऊन दुप्पटा घालण्याची गरज नसलेला हा केप लेहंगा हा सध्या ट्रेडिंगला आहे.
कुठे वापरू शकाल ? : मित्रमंडळींना भेटण्यासाठी, पूजेसाठी याची निवड उत्तम असेल आणि एक छोटासा नेकलेस लूकला परिपूर्ण करेल

शरारा आणि घरारा सेट




२०२५ मध्ये शरारा आणि घरारा ट्रेंड कमबॅक करत आहेत. आरामदायी आणि हलके फुलके असे हे शरारा आणि घरारा सेट.

ट्रेंडिंग स्टाईल्स

मस्टर्ड शरारा त्यावर केलेले भरतकाम हा एक उत्तम सेट
डिप मरुन कलर घागरा त्यावर असणारे मिरर वर्क
कमीत कमी ज्वेलरीसाठी सेज ग्रीन कलर शरारा

को - सेट्स




ज्या मुलींना भरजरी, जड कपडे घालायचे नसतील त्यांच्यासाठी को- सेट्स हा चांगला पर्याय आहे.
को- सेट्स घालण्यासाठी अगदी सोप्पा आणि दिसायलाही स्टायलिश.

ट्रेंडिंग स्टाईल्स

दिवाळी पार्टीसाठी सिक्कीन केलेले को- ऑर्डर सेट्स
कॅज्युअल फेस्टिव्ह लंचसाठी प्रिटेंड पेस्टल रंग
दिवाळीच्या सायंकाळी गडद रंगाचे Satin रंग परफेक्ट आहेत.

परफेक्ट फॅब्रिकस्


ऑर्गेन्झा: हलकी आणि तितकीच स्टाईलिश
जॉर्जेट : या फॅब्रिकमुळे हवा खेळती राहते ,त्यामुळे घाम कमी येतो.
मॉडेल क्रेप: मऊ , Comfortable, शायनी,
सॅटिन : इंडो वेस्टर्न लूकसाठी पर्फेक्ट

दिवाळीत स्टायलिश ड्रेसिंग साठी टिप्स


दागिने : लेहंगावर स्टेंटमेंट इअरिंग किंवा चोकर ,
को - ऑर्डरसाठी कमीत कमी दागिने

मेकअप: शायनी , साधारण चमकणारा बेस, दिवसा न्यूड लिपस्टिक, आणि रात्री बोल्ड लिपस्टिक
हेअरस्टाईल : बनसोबत गजरा,पार्टीसाठी कर्ल किंवा पोनिटेल
सॅन्डल : प्लॅट शूज किंवा ब्लॉक हिल्स

यंदा तुमच्या पारंपरिक दिवाळीला थोडासा ट्रेडिंग फॅशनचा ट्वीस्ट नक्की द्या.
Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा