कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना जाहीर केले

ओटावा : कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. भारतासोबतचे संबंध सुधारत असतानाच कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडा सरकारने हा निर्णय कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर घेतला आहे.


गेल्या वर्षी आरसीएमपी (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस) यांनी असा आरोप केला होता की, बिश्नोई टोळी कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करत आहे. मात्र भारताने हे आरोप फेटाळले होते.भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवरच कॅनडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या दबावानंतर हा ठराव झाला.


आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार, भारत बिश्नोई टोळीचा वापर कॅनडामधील लोकांवर विशेषतः खलिस्तान या वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी, खून करण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी करत होता. तथापि, भारत सरकारने या सर्व आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला आहे आणि सांगितले आहे की ओटावा सरकारसोबत मिळून ही टोळी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.द कॅनेडियन प्रेसनुसार, सेंटर फॉर इंटरनॅशनल गव्हर्नन्स इनोव्हेशनचे वरिष्ठ फेलो वेस्ली वॉर्क यांनी पूर्वी म्हटले होते की, या टोळीला दहशतवादी यादीत टाकल्याने फारसा फरक पडणार नाही, कारण कॅनडाची मुख्य समस्या म्हणजे गुन्हेगारी गुप्त माहिती गोळा करण्याची मर्यादित क्षमता होय.

Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे