New Rules from 1 October Overview: तुमच्या जीवनात मुलभूत बदल करतील असे 'हे' नवे नियम जीएसटी ते ई कॉमर्स वाचा एका क्लिकवर!

प्रतिनिधी: तुमच्या दैनंदिन कामकाजात परिणाम करतील असे नवे धोरणात्मक बदल सरकारने आपल्या नव्या नियमावलीत केले आहेत. हे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. जीएसटी रि फंड, एनपीएस गुंतवणूक, युपीआय व्यवहार, रेल्वे बुकिंग, ई कॉमर्स या क्षेत्रातील बदल १ तारखेपासून लागू झाल्यानंतर काही नियमांचा तुमच्या खिशाला फायदा होणार असला तरी काही निर्णयां मुळे नुकसानही होणार आहे. तर चटकन या निर्णयाचा आढावा घेऊयात…..


जीएसटी संबंधित नवे नियम:


आता व्यवसायांसाठी स्वयंचलित जीएसटी परतफेड प्रणाली (Gst Refund System) सुरू होईल. यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) च्या ९० टक्के पर्यंत जलद परतफेड करता येणार आहे. तथापि, हे परतफेड मिळविण्यासाठी आता आधार प्रमाणीकरण (Aadhar Authentication) अनिवार्य सरकारकडून करण्यात आले आहे.पान मसाला, तंबाखू, एरिका नट्स आणि आवश्यक ते ले यासारख्या वस्तूंसाठी कोणताही परतावा दिला जाणार नाही असेही सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते.'ट्रॅक अँड ट्रेस' प्रणाली अंतर्गत, जर कोणी एखाद्या प्रकरणात अपील केले तर त्यांना आता २५% ऐवजी फक्त १०% दंड रक्कम जमा करावी लागेल.


आता आयटीसी ऑटो-पॉप्युलेशन नाही


आता, आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) जीएसटीआर-२बी मध्ये स्वयंचलितपणे दिसून येणार नाही.जर क्रेडिट नोट जारी केली तर, आयटीसी पुरवठादाराला परत करावा लागेल. NPS निवृत्तीवेतन योजनेत बदल - एनपीएस (National Pension Scheme NPS) सदस्य आता १००% इक्विटी (स्टॉक) मध्ये गुंतवणूक करू शकतात (फक्त गैर-सरकारी गुंतवणूकदारां साठी) तुम्ही आता एका PRAN (कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक) वापरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.पूर्वी, तुम्ही फक्त एकच योजना निवडू शकत होता आता मात्र एका 'हेड' अंतर्गत विविध इक्विटी योजनेतून आपल्या उद्दिष्टानुसार परतावा (Returns) कमवू शकता.१५ वर्षांनंतर बाहेर पडण्याची परवानगी आता आहे. पूर्वी लोकांना निवृत्तीपर्यंत वाट पहावी लागत होती. तसेच घर बांधणी, शिक्ष ण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी आंशिक पैसे काढणे या अडचणीच्या प्रसंगी पैसे काढणे सोपे झाले आहे.


E Commerce नवे नियम -


जर नोंदणीकृत नसलेल्या किंवा कंपोझिशन व्यापाऱ्यांनी पुरवठा केला तर नवीन नियमांनुसार ई-कॉमर्स ऑपरेटर (E Commerce Operators ECO ) साठी दंड देखील भरावा लागणार आहे ई सीओंना २०००० रुपये किंवा एकूण कर रक्कम जी जास्त असेल त्या प्रमाणात दंड आकारला जाईल.


रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम


नव्या नियमानुसार रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य असणार आहे.आयआरसीटीसीवर बुकिंग विंडो उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांतच आधार-सत्यापित (Aadhar Authenticated) करुनच वापरकर्ते (Users) तिकिटे बुक करू शकतात.


UPI पुल पेमेंट्स बंद होणार !


ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी युपीआय पुलमधील 'पुल' वैशिष्ट्य - जिथे कोणीतरी तुमच्या खात्यातून पैसे मागू शकते ते आता बंद केले जाईल. यामुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होती ल असे सरकारने म्हटले होते.


ऑनलाइन गेमिंगला नवीन कायदा -


रिअल-मनी ऑनलाइन गेमिंगवर एक नवीन कायदा लागू होईल.यामुळे अशा गेमवर निर्बंध येतील आणि गेमिंग कंपन्यांचे नियमन आणि देखरेख वाढेल.व्यवसाय आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी नियम कडक करताना, सिस्टम सुधारणे, डिजिटल सुरक्षितता वाढवणे आणि पेन्शन गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता देणे हे या बदलांचे उद्दिष्ट आहे असे सरकारने म्हटले होते.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

भारतीय बाजारात अ‍ॅपल मोठ्या संकटात? गुप्त अहवालात मोठी माहिती उघड

प्रतिनिधी: भारतीय बाजारात अ‍ॅपल कंपनी नव्या संकटात सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commision of India) या नियामक

बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, महापालिकेवर पुन्हा सत्ता

विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे