वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार

मुंबई : वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार आहेत. जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे- कुर्ला संकुलच्या (बीकेसी) धर्तीवर आता लवकरच वरळीतही मिनी बीकेसी वसवण्यात येणार आहे. वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेचा विकास मिनी बीकेसी म्हणून करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.


२०२३ मध्ये एमएमआरडीएने वरळी आणि कुर्ला दुग्धशाळेच्या जागेसह मुंबईतील अन्य काही पडून असलेल्या मोक्याच्या जागा शोधून त्या जागांचा विकास बीकेसीच्या धर्तीवर मिनी बीकेसी म्हणून करण्याचा प्रस्ताव प्राधिकरण बैठकीत मंजूर करून घेतला. त्यानंतर या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यताही घेतली, मात्र वरळीसह अन्य ठिकाणच्या जागेचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएची त्या त्या क्षेत्राकरता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होणे आवश्यक होते. त्यानुसार यासंबंधीचे प्रस्ताव एमएमआरडीएकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले होते.


या प्रस्तावांच्या मान्यतेची प्रतीक्षा एमएमआरडीएला होती. आता वरळी दुग्धशाळेच्या क्षेत्रासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. या शासन निर्णयानुसार वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर क्षेत्रासाठी एमएमआरडीएची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या

कांजूरमार्ग ते बदलापूर प्रवास होणार जलद, सोपा

मेट्रो १४ असणार देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बदलापूर

म्हाडा राज्यात साडेअकरा हजार घरे बांधणार

मुंबईत सर्वसामान्यांसाठी १ हजार ४७४ घरे मुंबई : म्हाडाकडून चालू आर्थिक वर्षांत सामान्यांसाठी किती घरे उपलब्ध

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर

ब्लॅकमेल ऑपरेशन : जस्ट डायलद्वारे मसाज करायचंय, तर हे पहाच!

न्यूड व्हिडिओच्या धमकीने हायकोर्टाच्या वकिलाला ब्लॅकमेल करणारे भामटे गजाआड मुंबई : एका ६३ वर्षीय उच्च