हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो, हृदयविकाराचा झटका कोणालाही, कुठेही आणि कधीही येऊ शकतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं ओळखणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच हृदय मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणेही गरजेचे आहे.

हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष बियांचे सेवन उपयुक्त ठरते. या बिया शरीराला आवश्यक असलेले पोषणद्रव्य, फायबर्स, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडन्ट्स आणि अन्य महत्वाची तत्त्वे पुरवतात, जे हृदयासाठी हितकारक असतात.

चला जाणून घेऊया कोणत्या बिया हृदयविकार टाळण्यास मदत करू शकतात:

१) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्त्व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका कमी होतो.

२) सूर्यफूल बिया

या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवण्यास मदत करतात.

३) चिया सिड्स

चिया सिड्स हे फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्सचा उत्तम स्रोत आहेत. हे बिया नियमित घेतल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी होते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

४) तीळ

तीळ हे हृदयासाठी लाभदायक असून ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. रोज एक चमचा तीळ सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.

५) अळशीच्या बिया

अळशीचे दाणे मॅग्नेशियमने भरलेले असतात आणि त्यात लिनोलिक अ‍ॅसिडसुद्धा आढळते. यामुळे कोलेस्टेरॉल पातळी १५% पर्यंत घटते आणि हृदयाचे ठोके नियमित राहतात. त्यामुळे कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो.

६) मेथीचे दाणे

मेथीमध्ये विरघळणारे फायबर्स आणि स्टेरॉइडल सॅपोनिन्स असतात, जे यकृतातील कोलेस्टेरॉलचे उत्पादन थांबवतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर या नैसर्गिक बियांना आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे हृदयविकारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते.
Comments
Add Comment

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात