एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती


मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन रुळांमधील कुंपणावर पडले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या हाती नवी माहिती आली आहे. सीएसएमटी-कर्जत लोकलच्या नवव्या किंवा दहाव्या डब्याच्या पायदानावर उभ्या असलेल्या प्रवाशाकडे ३० सेमी जाडीची बॅग होती. ही बॅग समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या पायदानावर उभ्या प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काही लोकलमध्ये; तर काही रुळांवर पडले. कसारा-सीएसएमटी लोकलच्या काचांवर आलेले ओरखडेही या बॅगमुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कर्जत लोकलमधील प्रवासी पायदानावर उभा असताना बॅग सावरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारात त्याचा तोल गेला आणि तो समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलवर आदळला. त्यामुळे त्याच डब्यातील आणखी काही प्रवासी खाली पडले. ताशी १५० किमी वेगाने लोकल धावत असताना दोन्ही गाड्यांमध्ये फक्त साधारण ०.७५ मीटर अंतर होते. यामुळे हे लहान वाटणारे कारण मोठ्या अपघाला कारणीभूत ठरू शकते असे निरीक्षण समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. हाती आलेल्या या नव्या माहितीमुळे एक जाडजूड बॅग ही रेल्वे प्रवाशांच्या अपघाती मृत्यूचे कारण ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार जाडजूड बॅग अपघाताला कारणीभूत ठरली आहे. यामुळे पायदानावर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई, प्रलंबित ऐरोली-कळवा उन्नत रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करणे, नव्या मार्गिका उभारणे; ही कामं करण्याची शिफारस समितीकडून रेल्वे मंडळाला करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेसाठी 'आप'ची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी आम आदमी पार्टीने अर्थात 'आप'ने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्य

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

WhatsApp वरच प्रोफेशनल फोटो एडिटिंग; स्टेटस एडिटरमध्ये मेटा AI टूल्सची चाचणी सुरू

कॅलिफोर्निया : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता कोणतेही वेगळे अ‍ॅप न वापरता WhatsApp वरच प्रोफेशनल

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.