Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर


मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. अबू धाबीतील भारतीय दूतावास आणि दुबईतील 'काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया'चे प्रतिनिधी सातत्याने तिथल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. "भारतीय नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे," असा विश्वास दूतावासाने दिला आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट संपर्कात; मदतीसाठी यंत्रणा कार्यान्वित




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, ते दुबईतील 'इंडियन पीपल्स फोरम' या संस्थेच्या सतत संपर्कात आहेत. तेथील मराठी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष समन्वय साधला जात आहे. महाराष्ट्रातील जे नागरिक सध्या दुबई किंवा अबू धाबीत अडकले आहेत किंवा तिथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने एक अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देखील जारी केला आहे. या सुविधेमुळे नागरिकांना तातडीची माहिती आणि साहाय्य मिळणे सोपे होणार आहे.



महत्त्वाची सूचना आणि संपर्क माहिती


यूएईमधील मराठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी अबू धाबीतील भारतीय दूतावास (@IndembAbuDhabi) आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया (@cgidubai) यांच्या 'X' (ट्विटर) खात्यांना फॉलो करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मदतीसाठी खालील क्रमांकाचा वापर करावा. अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक : +971 50 365 4357

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी