अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रशासनाला अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.


महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक बुडाले असून, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ७२ तास संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.


मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये रविवारपासून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाला या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदूर्ग आणि नाशिकमधील घाटमध्य प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण पट्टा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


मराठवाड्यात मुसळधार पाऊस असल्याने परिणामी, जायकवाडी, सीना कोळेगाव, कोयना आणि गोसीखुर्दसह प्रमुख धरणांनी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे अनेक ग्रामीण भाग पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे, जायकवाडी धरणातून १.२५ लाख क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले, तर सीना नदीवरील धरणांमधून ६०,०००-७५,००० क्युसेक पाणी सोडण्यात आले. विदर्भात, प्रशासनाने गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडले, ज्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. यामुळे नदीची पातळी वाढली आहे आणि नद्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे शेतात आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे, अनेक ठिकाणी गावकरी अडकले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.


आजपर्यंत शहर आणि उपनगरातील अनेक भागात दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिंडोशीमध्ये १०२ मिमी, मालाडमध्ये १०१ मिमी पाऊस नोंदला गेला. यानंतर बोरिवलीमध्ये ९७ मिमी, मालवणीमध्ये ९५ मिमी आणि मागाठाणे येथे ९४ मिमी पाऊस नोंदला आहे. दरम्यान, पवई (८४ मिमी), मुलुंड (८० मिमी) आणि चेंबूर (७७ मिमी) या पूर्व उपनगरांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडला. तर भायखळा येथे (९५ मिमी), वडाळा (८४ मिमी) आणि माटुंगा (८२ मिमी) येथे पाऊस पडला.


राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भूस्खलन, ढगफुटीसदृश पाऊस किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य त्वरित सुरु करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांना सज्ज राहण्याचे सांगितले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास चालू ठेवणे, बचावकार्य व तांत्रिक साधने तयार ठेवणे या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.


संभाव्य परिस्थिती लक्षात घेता, 17 जिल्ह्यांसाठी आपात्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.01. बीड – 02442-299299 02. लातूर – 02382-220204 03. धाराशिव – 02472-227301 04. नांदेड – 02462-235077 05. परभणी – 02452-226400 06. सोलापूर – 0217-2731012 07. पुणे – 09370960061 08. सातारा – 02162-232349 09. अहिल्यानगर – 0241-2323844 10. गडचिरोली – 07132-222031 11. कोल्हापूर – 02312-659232 12. रायगड – 08275152363 13. रत्नागिरी – 0705722233 14. सिंधुदुर्ग – 02362-228847 15. पालघर – 02525-297474 16. ठाणे – 09372338827 17. मुंबई शहर व उपनगर – 1916/022-69403344 यासोबतच मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक 01. 022-22027990 02. 022-22794229 03. 022-22023039 04. 09321587143 आपात्कालीन परिस्थितीत वरील क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर

ब्लॅकमेल ऑपरेशन : जस्ट डायलद्वारे मसाज करायचंय, तर हे पहाच!

न्यूड व्हिडिओच्या धमकीने हायकोर्टाच्या वकिलाला ब्लॅकमेल करणारे भामटे गजाआड मुंबई : एका ६३ वर्षीय उच्च

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये

शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट

एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार!

परिवहन महामंडळाचे कुर्ला, बोरिवली, राज्यातील इतर शहरांमध्ये भूखंड मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या राज्यातील बस