‘एक्सएफजी’ व्हेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगाला फटका बसला होता. कोरोना व्हायरसमुळे अनेक कुटुंबांना आपल्या सदस्यांना गमवावे लागले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार करोनाचा ‘एक्सएफजी’ व्हेरिएंट समोर आला आहे. त्याला स्ट्रेटस असे म्हटले जाते. जानेवारीमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला आणि आता तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे आणि भारतासह संपूर्ण जगाने सतर्क राहण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये स्ट्रेटस पहिल्यांदा आढळून आला. जूनपर्यंत तो ३८ देशांमध्ये पसरला होता. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या नऊ राज्यांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामध्ये न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअर, वर्मोंट, मिशिगन, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, नॉर्थ डकोटा आणि साउथ डकोटा यांचा समावेश आहे.
स्ट्रेटसची ‘ही’ लक्षणे आहेत
- श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत जडपणा जाणवणे
- घसा खवखवणे
- डोकेदुखी आणि अंगदुखी
- पोट खराब होणे किंवा भूक न लागणे
- मळमळ आणि उलट्या
- मानसिक थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- चव आणि वासाची जाणीव कमी होणे
अशी घ्या आरोग्याची काळजी
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधे घ्या.
- घरगुती उपचाराने आराम मिळू शकतो.
- नीट विश्रांती घ्या, खूप दगदग किंवा जास्त काम करू नका.
- संतुलित आहार घेऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.