‘वोकल फॉर लोकल’ भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम; पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार


कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन


कुडाळ :'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. या उपक्रमातून भारताला आर्थिक सुभत्तता आणि महासत्ता बनवण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


भारतीय जनता पार्टी, कुडाळ महिला मोर्चा आयोजित 'वोकल फॉर लोकल'सेवा पंधरावडा निमित्त स्थानिक बचत गट उत्पादित केलेल्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे फित कापून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा भाजपने कुडाळ येथे हे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांचे प्रदर्शन झाले . यात तपस्या क्रियेशन पिंगुळी, किमया आयुर्वेदिक, माऊली बचत गट कालेली, स्वामी समर्थ परुळे, गायत्री आंबेगाळी, रामेश्वर कुडाळ, कोसंबी अणाव, तेजस्विनी नाबारवाडी , साई समूह पिंगुळी अशा सुमारे २० बचत गटांनी आपली उत्पादने प्रदर्शनात आणली होती. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ.श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, बंड्या सावंत, सौ. संध्या तेरसे , संजय वेगुर्लेकर, आरती पाटील. अदिती सावंत, मुक्ती परब, विजय कांबळी, गजानन वेगुर्लेकर आदी सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, “भारतातील स्थानिक बाजारपेठेत एवढी क्षमता आहे की भविष्यात इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने चाललो तर जगातील इतर राष्ट्रे भारताकडे महासत्ता म्हणून पाहतील. मात्र हे बोलणं जितकं सोपं आहे, तितकीच जबाबदारी आपल्यावरही मोठी आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला मंत्र सिंधुदुर्गात राबविला जात आहे.”


महिला मोर्चाच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून सिंधुदुर्गातील लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. “स्थानिक उत्पादकांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. मुंबईसह इतर मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहोत,” असेही स्पष्ट केले.


राणे म्हणाले, “पुढील दोन आठवड्यांत मंत्रालयामध्ये सिंधुदुर्गातील उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास ४० स्टॉल्स लावले जाणार आहेत. लघुउद्योगांना दर्जेदार बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि पुढील पाच वर्षांत ती निश्चित पूर्ण करू.” असे आश्वासनही पालकमंत्री निदेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास

'संजय राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उबाठाची वाट लावावी'; मंत्री संजय शिरसाटांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या