मोहित सोमण:रात्री उशीरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजार सकाळी कोसळले. फार्मा, आयटी, मिडस्मॉल हेल्थकेअर, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने शेअर बाजारात दबाव पातळी निर्माण झाली आहे. आज स लग सहाव्या सत्रात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४०७.७३ अंकाने व निफ्टी ११६.१५ अंकांने घसरण झाली आहे. सकाळी बँक व फायनांशियल सर्विसेससह फार्मा शेअर्समध्ये नुकसान सुरू असल्याने आजही सेल ऑ फ सुरू राहणार आहे. आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचे सत्र सुरू राहू शकते. सकाळच्या सत्रात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्व समभागात घसरण कायम आहे जी गिफ्ट निफ्टीतील संकेतांंनंतरच स्पष्ट झाली होती. सर्वाधिक घसरण आय टी (१.२१%), हेल्थकेअर (२.१७%), फार्मा (२.३२%), मिड स्मॉल हेल्थकेअर (२.३१%), पीएसयु बँक (१.०८%) निर्देशांकात झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत काल युएस शेअर बाजारात जीडीपीची आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये युएस वाणिज्य विभागाने गेल्या तिमाहीसाठी वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दुसरा आढावा जाहीर केल्याने दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेला वेग आला. आर्थिक विश्लेषण ब्युरो (BEA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दुसऱ्या तिमाहीच्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) चा तिसरा आणि अंतिम अंदाज जाहीर केला, ज्यामध्ये एप्रिल ते जून या कालावधीत अर्थव्यवस्था वार्षिक ३ .७% दराने वाढली असल्याचे दिसून आले. हा आकडा LSEG ने सर्वेक्षण केलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या ३.३% अंदाजापेक्षा जास्त होता आणि वाणिज्य विभागाच्या सुरुवातीच्या दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपी अंदाजापेक्षा जास्त होता. काल युएस बाजारातील अखेरच्या स त्रात बाजारात तीनपैकी दोन बाजारात घसरण झाली. ज्यामध्ये एस अँड पी ५०० (०.५०%), नासडाक (०.५०%) बाजारात घसरण झाली असून डाऊ जोन्स (०.१०%) निर्देशांकात वाढ झाली. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात आज बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सर्वाधिक वाढ आरआयईटीएस (RITES) (५.१५%), गोदरेज अँग्रोवेट (२.६०%), टाटा टेलिकॉम (२.३८%), अनंत राज (२.२३%), एनएलसी (१.४१%), बीएसई (१.२४%), लार्सन अँड टयुब्रो (१.२०%), एयु स्मॉल फायनान्स बँक (१.१३%), जेएम फायनांशियल (१.२१%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.२१%), जेएसडब्लू स्टील (०.६५%), आयशर मोटर्स (०.५०%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.३५%), टाटा मोटर्स (०.६३%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोक्हार्ट (६.५०%), कँपलिन लॅब्स (५.१८%), नाटको फार्मा (५.०७%), वारी एनर्जीज (५.०२%), लारूस लॅब्स (४.०४%), अजांता फार्मा (३.५१%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (३.४९%), अलेंबिक फार्मा (३.४६%), होनसा कं ज्यूमर (३.४६%), एचएफसीएल (३.४४%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (३.३६%), झायडस लाईफसायन्स (३.१७%), सनफार्मा (२.९८%), डिवीज लॅब्स (२.९७%), इपका लॅब्स (२.९२%) समभागात मोठी घसरण झाली आहे.
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या फार्मा आयातीवर १००%, किचन कॅबिनेटवर व बाथरूम व्हॅनिटीवर ५०%, फर्निचरवर ३०%, व अवजड ट्रक्सवर २५% टॅरिफ जाहीर केला आहे. त्यामुळे हे नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू होतील. ट्रुथसोशल या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती. अखेर नवे दर लागू झाली आहे. यापूर्वी १५०%,२००% टॅरिफ फार्मा उत्पादनावर सुरु होती मात्र यापूर्वी सद्यस्थितीत फार्मा उत्पादनावर वाढीव शुल्क नस ल्याने दिलासा मिळाला होता. आता मात्र धमकी प्रत्यक्ष उतरवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मात्र फार्मा उत्पादनावर शुल्क वाढवून उद्योगविश्वाला हादरा दिला आहे. ज्यामुळे आजही गुंतवणूकदारांना निराशा पदरी पडण्याचीच अधिक शक्यता आहे.